Dr. Pravin M. Gharpure
Associate Professor & Head, Department of Marathi
Jeevan Vikas Mahavidyalaya, Devgram, Tah. Narkhed, Dist. Nagpur
CONTACT DETAILS:
E-mail: pgharpure76@gmail.com
Mobile No. 9764572771
Ph.D Subject : वारकरी संप्रदायी कुटुंबकवींची अभंगवाणी: एक चिकित्सक अभ्यास (संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा)”, awarded by Rashatrasant Tukdoji Maharaj Nagpur University, Nagpur on 3rd January 2020.
POSITION HELD IN THE COLLEGE:
Admission committee Co-ordinator from 2018-19 to 2021-2022;
Alumni Association Co-ordinator from 2004 to 2021
IQAC Member from 2012 to 2021
Cultural Committee Co-ordinator from 2015-2016 to 2019-2020.
College level RTMNU Examination Chief Supervisor from 2019-2020 to 2020-2021.
Library Committee Member from 2020 to onward.
DEPARTMENTAL ACHIEVEMENT:
Eight Students got Memorable Prize in Marathi Literature awarded by Rashatrasant Tukdoji Maharaj Nagpur University from 2000 to 2016
Three Gold Medal in Marathi Literature awarded by Rashatrasant Tukdoji Maharaj Nagpur University in 2010-2011
Three Postgraduate student are in the Merit List of Rashatrasant Tukdoji Maharaj Nagpur University in Marathi
No. of edited books: 01
No. of articles Published in edited book: 10
No. of research Papers Published in National and International Journal: 13
No. of Workshop, Seminar, Conferences attended: 65
No. of Guest Lectures delivered: 14
National Level Seminar/ Conferences Organized: 01
Member of NUTA
Member of Marathi Pradhyapak Prishad, Rashatrasant Tukdoji Maharaj Nagpur University, Nagpur.
मराठी विभाग :
ग्रामीण भागातील देवग्रामसारख्या छोट्याशा पुनर्वसित गावात अंत्योदय मिशन, देवग्राम द्वारा संचालित जीवन विकास महाविद्यालय, देवग्राम हे पदवी महाविद्यालय डॉ भाऊसाहेब भोगे यांच्या मार्गदर्शनात सन १९९६ मध्ये सुरू करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यांच्यात जीवनमूल्ये व कलामूल्ये रूजावित या उदात्त हेतूने महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच आवश्यक मराठी आणि मराठी वाड्.मय हे विषय महाविद्यालयात सुरू करण्यात आलेले आहे. सुरुवातीला केवळ ६० विद्यार्थी संख्या असलेल्या या महाविद्यालयात नंतर मात्र सातत्याने वाढ होत गेली. महाविद्यालयाच्या संख्यात्मक आणि गुणात्मक विकासाबरोबरच मराठी विभाग महाविद्यालयातील कृतिशील आणि गौरवशील विभाग आहे. महाविद्यालयाच्या सुरुवातीला मराठी विभागामध्ये डॉ. नरेश महाजन आणि डॉ. अशोक भक्ते यांनी विभाग प्रमुख म्हणून कार्य केले असून विद्यमान परिस्थितीत मी डॉ. प्रवीण घारपुरे, मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. तसेच माझे सहकारी प्रा. उमेश निस्वादे, प्रा. अशोक कापसे, प्रा. धनराज पांडव मराठी विभागात कार्यरत आहे. मराठी विभागाच्या गौरवशाली परंपरेत महाविद्यालयातील काही विद्यार्थी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षेत सुवर्णपदकासह उत्तीर्ण झाले असून काही विद्यार्थी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहे. तसेच केवळ पदवी अभ्यासक्रम सुरू केल्यानंतर सन २०१२-२०१३ मध्ये पदव्युत्तर मराठी विभाग सुरू करण्यात आला. या विभागाच्या वतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर उच्च शिक्षण घेण्याकरिता संधी उपलब्ध व्हावी, या उदात्त हेतूने पदव्युत्तर उच्च शिक्षण सुरू करण्यात आले. पदव्युत्तर मराठी विभागाचे देखील अनेक विद्यार्थी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये आलेली आहे. ही मराठी विभागाच्या दृष्टीने अतिशय गौरवाची बाब आहे. महाविद्यालयातील मराठी विभागाच्या या उत्कर्षामागे महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. देवेंद्र भोंगाडे यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभलेले आहेत. आज मराठी विभागातील अनेक विद्यार्थी जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये यशस्वीरित्या कार्यरत आहेत. प्रस्तुत महाविद्यालय देवग्राम परिसरातील आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील एक नावलौकिक प्राप्त महाविद्यालय आहे.
VISION
१) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वाङ्मय जाणीव विकसित करणे.
२) विद्यार्थ्यांमध्ये साहित्य वाचनाची अभिरुची निर्माण करून भाषिक व लेखन कौशल्य रुजविणे.
३) व्यावहारिक भाषा कौशल्य विकसित करणे.
MISSION
१) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वाङ्मय जाणीव विकसित करण्यासाठी कथा, कविता, नाटक, कादंबरी, वैचारिक व ललित निबंध या ललितसाहित्य प्रकारांची जवळून ओळख करून देण्याचा प्रयत्न केला जातो.
२) मराठी भाषेचे भाषिक कौशल्य आत्मसात करण्यासाठी नाट्य वाचन काव्यवाचन कथा वाचन वैचारिक ग्रंथांचे वाचन यासारखे उपक्रम राबविले जातात.
३) विद्यार्थ्यांमध्ये लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी काव्य लेखन कथालेखन निबंध लेखन यासारख्या लेखन प्रकाराची ओळख करून देणे.
४) व्यावहारिक जीवनात उपयोगी पडणारी कला कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी पत्र लेखन, शुद्धलेखन, भाषांतर, सारांशलेखन, स्मरणिका संपादन, ग्रंथ परीक्षण, जाहिरात लेखन यासारखे उपक्रम राबविले जातात.
Program Outcomes / Course Outcomes
Departmental Report : 2022-2023