Yashwantrao Chavan Maharashtra Open University (YCMOU)
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ , नाशिक
अंत्योदय महाविद्यालय,देवग्राम
ता. नरखेड जि.नागपूर
अभ्यासकेंद्र क्र. 44185
अभ्यास केंद्राविषयी………
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी देवग्रामसारख्या छोट्याश्या गावामध्ये गुरुवर्य डॉ.भाऊसाहेब भोगे यांनी अंत्योदय मिशन या संस्थेची स्थापना केली आणि या माध्यमातून प्राथमिक, माध्यमिक , कनिष्ठ महाविद्यालयीन, पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षणाचे केंद्र देवग्राम येथे निर्माण केले. १९९६ मध्ये सुरु झालेल्या अंत्योदय महाविद्यालयाच्या माध्यमातून कनिष्ठ महाविद्यालयीन, पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण रा.तु.म. नागपूर विद्यापीठाच्या अंतर्गत दिले जाते. परंतु शिक्षणाच्या अखंडित चालणाऱ्या प्रवाहापासून कोणीही वंचित राहू नये तसेच महाविद्यालयीन शिक्षण सर्वाना मिळावे. जे व्यक्ती नियमित महाविद्यालयामध्ये जाऊन शिक्षण घेऊ शकत नाही, ज्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे किवा जे लोक अन्य खाजगी नोकरीत आहे अशा प्रकारच्या सर्व लोकांना आपले पदवीचे शिक्षण पूर्ण करता यावे या उद्देशाने सन २००६ मध्ये अंत्योदय महाविद्यालयाच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत दूरस्थ शिक्षणाची सुरुवात करण्यात आली. बी. ए. आणि बी. कॉम. हे दोन शिक्षणक्रम या अभ्यास केंद्रावर सुरु आहे दरवर्षी साधारणतः ६०० ते ७०० विद्यार्थी . ए. आणि बी. कॉम. या शिक्षणक्रमाला प्रवेशित असतात तसेच २०० ते २५० विद्यार्थी बी. ए. आणि बी. कॉम.ची पदवी घेऊन पदवीधर होत आहेत.
अभ्यासकेंद्राची वैशिष्ट्ये –
- सुसज्ज आणि प्रशस्त इमारत
- निसर्गरम्य परिसर
- अनुभवी समंत्रक वर्ग
- दर रविवारला समंत्रण वर्ग
- आधुनिक माहिती तंत्रज्ञान सुविधा
प्रशासकीय व्यवस्था
डॉ. देवेंद्र भोंगाडे – केंद्रप्रमुख (प्राचार्य)
प्रा. धनराज पांडव – केंद्र संयोजक
प्रा. दिनेश पांगुळ – केंद्र सहायक